चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील तांबोळे बु. शिवारातील गट नं. 87/2/1 व 87/2/2 शेतातील इलेक्ट्रीक डी.पी. क्र. 8141405 पुढील 7 व्या पोल पासून ते 17 व्या पोलपर्यंत ईलेक्ट्रीक पोल वरील ईलेक्ट्रीक तारा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तांबोळे बु. गावातील शेतकरी रविंद्र सिताराम पाटील यांच्या तांबोळे बु. शिवारातील गट नं. 87/2/1 व 87/2/2 माझ्या शेतातील इलेक्ट्रीक डी.पी. क्र. 8141405 पुढील 7 व्या पोल पासून ते 17 व्या पोलपर्यंत 30 हजार रुपये किंमतीच्या ईलेक्ट्रीक पोल वरील अल्युमिनीयमच्या सुमारे 2.40 कि.मी. लांबीच्या 50 एम एम च्या ईलेक्ट्रीक तारा अज्ञात चोरट्याने दि 04/05/2023 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास ते दि. 05/05/2023 रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान चोरून नेल्या आहेत याप्रकरणी महेश सुधीर शेळके 28 कनिष्ठ अभियंता म.रा.वि.वि. क मर्या. गणेशपूर कक्ष, ता. चाळीसगांव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.