पहूर ( प्रतिनिधी ) – पाळधी येथील माहेर असलेल्या विवाहितेला शेतात ट्यूबवेल लावण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत मारहाण करून छळ केल्याचा प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी ८ मे रोजी दुपारी ४ वाजता पतीसह सासरच्या मंडळीं विरोधात पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पहूर पोलिसांनी दिलेली माहितीवरून, जामनेर तालुक्यातील पाळधी येथील माहेर असलेल्या ज्योती अनिल ठाकूर यांचा विवाह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील अनिल गणेशसिंग ठाकूर यांच्याशी २०१९ मध्ये रीतीरीवाजानुसार झाला. लग्नाच्या एक महिन्यानंतर पती अनिल ठाकूर याने लहान सहान गोष्टींवरून त्रास देणे सुरू केले. त्यानंतर शेतात ट्यूबवेल लावण्यासाठी बाहेरून पाच लाखांची मागणी केली. विवाहितेने माहेरून पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. शिवाय सासु, जेठ आणि जेठाणी यांनी देखील पैशांसाठी त्रास दिला. हा त्रास सहन झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी सोमवारी ८ मे रोजी दुपारी ४ वाजता पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पती अनिल गणेशसिंग ठाकूर, सासू सरुबाई गणेशसिंग ठाकूर, जेठ सुवर्णसिंग गणेशसिंग ठाकूर आणि जेठाणी ज्योती सुवर्णसिंग ठाकूर सर्व रा. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश यांच्या विरोधात पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.