भडगांव (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनानिमित्त पंचायत समिती राजमाता जिजाऊ सभागृहात सीडीपीओ लता सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शिवप्रेरणा प्रतिष्ठान अध्यक्षा मिना बाग, महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. शिवप्रेरणा प्रतिष्ठान अध्यक्षा मिना बाग यांनी बचतगट माध्यमातून महिलांसाठी स्वयंरोजगार संधी व शासकीय योजनेचा लाभ मिळवून त्याद्वारे महिला सक्षमीकरण वर भर द्यावा याबाबत मार्गदर्शन केले. महिला दक्षता समिती अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांनी महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार निराकरण, कायदा, सुव्यवस्था तसेच कौटुंबिक कलह समुपदेशन बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लता सावंत यांनी महिला वर्गाने स्वकर्तुत्वावर भर द्यावा असे नमूद केले. सदर प्रसंगी पर्यवेक्षिका सुप्रिया सूयवंशी, सरिता शेजवळ, हिरकना संदानशिव, अंगनवाड़ी सेविका साजेदाबी शेख, सुनिता महाजन, मदतनीस सविता मराठे, सुरेखा सोनार, वैशाली शिरसाठ, सेविका वंदना पवार, रंजना सोनार, सरला देशमुख, वसुंधरा देशमुख, मदतनीस मंगला घिसाडी, मिना पाटील आदि महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.