जळगाव ( प्रतिनिधी ) – बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्यातील सात महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित महिलेला ८ जून रोजी सकाळी शहरातील जैनाबाद येथून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
कांचन नगर, असोदा रोड येथील रहिवासी २३ वर्षीय सपना सागर पाटील या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. “बाल लैंगिक अत्याचार गुन्ह्यात संशयित आरोपी सपना पाटील हिच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात १० डिसेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित महिला आरोपी सपना पाटील फरार होती.
ही महिला कांचन नगर परिसरात जैनाबाद येथे असल्याची गोपनिय माहिती पेा नि प्रताप शिकारे यांना मिळाली. पो उ नि दिपक जगदाडे, स फौ आनंदसिंग पाटील, पो ना दत्तात्रय बडगुजर, विकास सातदिवे, गणेश शीरसाळे, योगेश बारी, पोकॉ छगन तायडे व पोकॉ सपना येरंगुठला, मुकेश पाटील यांनी कारवाई करत ८ जून रोजी सकाळी जैनाबाद येथून संशयित महिला आरोपी सपना पाटील हिला ताब्यात घेतले.