जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. अविनाश आचार्य प्राथमिक शाळेच्या परिसरात आषाढी एकादशीनिम्मित दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सभाग घेत विठ्ठल – रुख्मिणीचा जयजयकार केला.
८ जुलै रोजी काढण्यात आलेल्या दिंडीत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेषांत सहभाग घेतला. या छोट्या वारकऱ्यांनी हरी नामाचा जयघोष केला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत पावलीत सहभाग घेतला. मुलींनी फुगडी खेळत दिंडीत रंगत वाढवली. डोक्यावर तुळशी घेऊन विठ्ठलाचे नामस्मरण केले. पदमनाभ पोळ व सई मुळे या विद्यार्थ्यांनी सुत्रसंचालन केले. दक्ष राजपूत याने आषाढी एकादशीची माहिती सांगितली. मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. नंतर दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली. विठ्ठल रुख्मिनीची वेशभूषा यशश्री महाजन व सुदेश पाटील या विद्यार्थ्यांनी केली होती. संगीत शिक्षकांनी जय जय राम कृष्णहरी हे गीत सादर केले. कार्यक्रम प्रमुख प्रतिभा चौधरी व योगेश जोशी होते.