यावल ( प्रतिनिधी )- अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावरील वढोदाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक पद्माकर नेवे (वय-५२ , रा. साकळी ता. यावल ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
अशोक नेवे कुटुंबियांसह साकळी येथे वास्तव्याला होते . अशोक नेवे यावल येथून काम आटोपून एमएच १९डी एक्स ५४८२ क्रमांकाच्या मोटरसायकलने साकळी गावी जात असतांना यावल चोपडा मार्गावरील वढोदे जवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेनंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ७ जुलै रोजी सायंकाळी मयत अशोक नेवे यांचे भाऊ चंद्रकांत पद्माकर नेवे यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो उ नि विनोद खांडबहाले करीत आहेत.