मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर येथील शासकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्यानंतर आपण गरोदर असल्याचे लक्षात आल्यावर या अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ मे रोजी रात्री घडली होती. पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार ती गर्भवती असल्याने तिने कंटाळून आत्महत्या केली आहे, असे सांगण्यात आले . हा प्रकार समोर आल्यानंतर तिने कोणालाही काहीही न सांगता १६ मे रोजी रात्री विषारी औषध पिऊन आत्महत्या केली . या संदर्भात मुक्तानगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहेत.