मुंबई (वृत्तसंस्था) – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. त्यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही अनुभवी नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. काही मंत्र्यांची खाती बदलण्यात आली आहेत. त्यात शिक्षणमंत्र्यांचाही समावेश आहे. त्याबाबत बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारला टोला हाणला होता. ‘कालपर्यंत रॉकेल, पेट्रोल विकणारे धर्मेंद्र प्रधान आता शिक्षणमंत्री झाले आहेत. त्याआधी रमेश पोखरियाल होते. ते कधी शाळेत गेले नव्हते, पण देशाचे शिक्षणमंत्री होते. पोखरियाल यांच्या आधी स्मृती इराणी होत्या, त्या मॉडेलिंग करायच्या. शिक्षणाचा काही संबंध नसलेले लोक शिक्षणमंत्री होतात, असं राऊत म्हणाले होते.
यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटवर व्हिडियो शेअर करत त्यांचा या विधानावर सडकून टीका केली आहे. काय म्हणाल्या चित्र वाघ संजयजी राऊत काल माननीय स्मृती इराणी यांच्याबद्दल जे बरळलात.मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे?? ते सांगा मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन, असं कॅप्शन त्यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले,’राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरेला कारे करण्याची भाषा वापरता येते, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.’