यावल (प्रतिनिधी) – आज दि. ०९ आगस्ट रविवार रोजी जागतीक आदिवासी दिनानिमीत्ता यावल शहरात विविध ठिकाणी सोशल डिस्टनसचे पालन करून आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावल येथील शिवसेना कार्यलयात जागतिक आदिवासी दिन व आदिवासी क्रांतिकारकांच्या यांच्या प्रतिमेला शिवसेना , युवासेना , शिवसेना आदिवासीचे सेल पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र सोनवणे, शिवसेना आदिवासी तालुकाप्रमुख हुसेन तडवी , शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना उपतालुका प्रमुख शरद कोळी, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष धोबी, युवासेना शहर प्रमुख सागर देवांग, युवासेना शहर समन्वयक सागर बोरसे , युवासेना शहर सरचिटणीस विजय पंडित , माजी तालुकाप्रमुख कडू पाटील , शिवसेना शहर संघटक सुनील बारी, शिवसेना विभाग प्रमुख योगेश राजपूत, शिवसेना सचिन कोळी यांच्या सह शिवसेना, युवासेना, शिवसेना आदिवासीचे सेल पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरातील तडवी कॉलनी मध्ये आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा पूजन करताना यावल नगरपालिका नगराध्यक्षा सौ.नौशाद मुबारक यावेळी तडवी कॉलनी यावल येथील तडवी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने सोशल डिस्टन्स बाळगून उपस्थित होते. दरवर्षी हा उत्सव पारंपरिक वाद्य वृंद वेशभूषा तथा नृत्य इत्यादीने समावेश असलेल्या मिरवणुकीने काढला जातो परंतु देशात असलेल्या कोरोना विषाणु महामारी मुळे यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्स ठेवून मास्क लावून शांततेत साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक पदाधिकारी मुबारक फत्तु तडवी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच ९ ऑगस्ट आदिवासी गौरव दिनाच्या औचित्य साधून आदिवासी एकता परिषद यांचेमार्फत तनवीर रशिद तडवी व व अंजुम रशिद तडवी व अरशिया मुबारक तडवी या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
शहरातील मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूल, तर्फे जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन हा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरा करण्यात आला त्यात जागतिक आदिवासी आणि क्रांती दिनानिमित्त हरिपुरा येथील आदिवासी लोकांना तसेच गरजू गरीब कुटुंबांना गहू, तांदूळ, डाळ ,अंघोडीचा साबण, कपडे धुण्याचे साबण बिस्कीट पुडा, एकत्रित असलेले धान्यांचे किट एम बी तडवी राज्याध्यक्ष आदिवासी संघटना, अध्यक्षा नीता गजरे, उपाध्यक्ष भूषण नागरे , सचिव धिरज पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी मीनल महाजन, पूजा मोरे, साक्षी अग्रवाल, सुनीता वाघ, शारदा पांडव इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावल येथील जिनींग प्रेस आवारात यावल तालुका आदीवासी कोळी समाजा मार्फत जागतिक आदीवासी दिन व हुतात्मा दिन मोठ्या मोठ्या उत्साहात सोशल डिस्टन्स चे पालन करून साजरा करण्यात आला. यावेळी जि.प.गटनेते व तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या हस्ते शहिद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भरत कोळी, अनिल कोळी ,जांलदर कोळी, अमर कोळी, गोकुळ तायडे (मनवेल ),निमगाव येथील पोलीस पाटील प्रमोद तावडे, बाळु कोळी, इम्ररान पहेलवान,काँग्रेस शहर अध्यक्ष कदीर खान,नईम शेख सह समाज बांधव उपस्थित होते. प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी जागतिक आदीवासी दिन व हुतात्म दिनाबाबत विशेष माहीती दिली. प्रास्तविक व सुत्रसंचालन जांलदर कोळी यांनी केले आभार भरत कोळी यांनी मानले.








