जळगाव ( प्रतिनिधी ) – गेल्या पंधरवाड्यात खुनाच्या ३ घटना घडल्यांनंतर आज जळगावात पुन्हा एकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. मेहरूण तलावाच्या काठावर अतिशय क्रूर पध्दतीने आज हा निर्घृण खून झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली.
मेहरूण तलावाच्या काठावर एक मृतदेह आढळून आला या व्यक्तीचे वय साधारणपणे पन्नास वर्षांच्या आसपास असावे त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. या मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचल्याचे दिसून येत असून दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रथमदर्शनी अंदाज आहे.
मेहरूण तलावाच्या काठावरील खुनाची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक चौकशीला प्रारंभ केला आहे. पंचनामा करण्याचे काम सुरू होते. गेल्या पंधरा दिवसांमध्ये जळगाव शहरात लागोपाठ झालेला हा चौधा खून असल्याने खळबळ उडालेली आहे.