पाचोरा (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगावचा पदग्रहण सोहळा दि. २६ रोजी झाला. या सोहळ्याला रोटरीचे नियोजित प्रांतपाल डॉ. राजेश पाटील, उपप्रांतपाल अभिजित भंडारकर, मोटिवेशनल स्पीकर गनी मेमन उपस्थित होते. मावळते अध्यक्ष प्रा डॉ. पंकज शिंदे व मावळते सचिव डॉ. मुकेश तेली यांच्याकडून नूतन वर्षाचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील व सेक्रेटरी शिवाजी शिंदे यांनी पदभार स्वीकारला.
दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या सत्काराने कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी कारगिल दिनानिमित्त शहिदांना शब्दसुमनांची भावांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी कवी पांडुरंग सुतार, आदर्श शिक्षक डॉ. संजय पाटील व प्रा. राजेंद्र चिंचोले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपप्रांतपाल अभिजित भंडारकर यांनी प्रांतपाल राजिंदर खुराणा यांचा संदेश वाचून दाखवला. रोटरी प्रांत ३०३० चे भावी प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांनी ओघवत्या शैलीत रोटरीचा परिचय करून दिला.
या वेळी अरुणा उदावंत, प्रा. गौरव चौधरी, शरद मराठे, चंद्रकांत पाटीत. गिरीश दुसाने डॉ. मुकेश राठोड, डॉ. अंकुर झंवर, डॉ. राहुल काटकर, रावसाहेब बोरसे यांना रोटरी क्लबचे सदस्यत्व देण्यात आले. डॉ. मुकेश तेली यांनी प्रास्ताविक केले. मावळते अध्यक्ष डॉ. पंकज शिंदे यांनी वर्षभरातील कामाचा आढावा मांडला. नूतन अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांनी आगामी वर्षाचा संकल्प जाहीर केला. नूतन सेक्रेटरी शिवाजी शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन सी. एन. चौधरी यांनी केले.