जळगाव (प्रतिनिधी) – आपण या समाजाकडून जितक भरभरून घेतो तितकं किंबहुना जास्त देण्याची वृत्ती तयार करणारी सुंदर पाठशाळा आणि ही पाठशाळा म्हणजेच मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाउंडेशन जळगाव अध्यक्ष आहेत. फिरोज शेख, बऱ्याचदा माणूस परिस्थितीवर मात करतो पण नियती मात्र तसे घडू देत नाही पण देवाकडून आलेले फिरोज याला अपवाद ठरतात, स्वतः गरीबीचे चटके भोगून आपला आयुष्य जगत असताना दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करत असल्याचे फिरोज शेख यांनी केसरिराजशी बोलताना सांगितले.
कविवर्य ना. धो. महानोर आपल्या कवितेतून आवाहन करतात


मोडलेल्या माणसांचे दुःख उराशी झेलताना
त्या उशाशी दीप लाव रोज रात्री झोपताना
माणसाचे दुःख जाणणारे,
फिरोज शेख पुढे म्हणाले की, खरतर मी काही फार श्रीमंत नाही आणि शिकलेले पण नाही पण सामाजिक कार्यात माझा हात कोणी धरू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीने हाक देताच, लगेच समोर फिरोज शेख उभा राहतो.
माझे वडील रफिक शेख व आई शहनाज शेख यांच्या कर्तृत्वाने मी सामाजिक कार्यात पुढे आहे. माझे शिक्षण नूतन मराठा विद्यालय या शाळेत पूर्ण केले. मुळातच माझा उद्योगी स्वभाव असतांना कामाची सवय यामुळे माझे स्वतःचे कारगिल टी. सेंटर हा चहाचा व्यवसाय सुरू केला आहे. तोंडात साखर डोक्यावर बर्फ तर हातात अमृततुल्य चहा अनेक लोक दुरून चहा पिण्यासाठी येत असतात यातूनच माझे वैशिष्ट्ये लक्षात येते प्रसंग कुठलाही असो मी मदतीसाठी तयार असतो. असं म्हणतात नजर को बदलो नजारे बदल जायेंगे, असे माझे मत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आजपर्यंत मला भरपूर पारितोषिके मिळाली. मौलाना आझाद अल्पसंख्यांक समाज विकास फाउंडेशनमार्फत सामाजिक कार्य सुरू आहे आणि ते अविरतपणे सुरू आहे, कधी सिव्हील हॉस्पिटल तर कधी झोपडपट्टी भागात कधी निराधारांसाठी तर कधी अंधारात खितपत पडलेल्या लोकांसाठी तर कधी कोरोना काळात तर कधी लहान मुलांसाठी अशा अनेक ठिकाणी आणि आणि धडाडीने त्यांचे सामाजिक कार्य अविरत सुरू आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत गरजू निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली आहे. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहे. निराधार वृद्धांना कडाक्याच्या थंडीत शाल स्वेटर देऊन मायेची उब दिली. निराधार परित्यक्ता विधवा या महिलांना औषधांसाठी खर्च देतात. स्वतःचा वाढदिवस अनाथाश्रमात साजरा करतात तसेच शासनाच्या हाकेला प्रतिसाद देत सामाजिक शैक्षणिक क्रीडा पर्यावरण आरोग्य या विषयांवर रॅली काढून जनजागृती केली आहे, त्याचबरोबर कोरोना संकटकाळात मास्क वाटप, खिचडी वाटप, किराणा किट वाटप, सुद्धा केले, परंतु याचा दर्प त्यांच्या आजूबाजूला कधी दिसतच नाही. हास्यमुद्रा असलेले नेहमीच कामात गुंतलेले असे कामसु तन-मन-धनाने समाजसेवा करणारे म्हणजेच फिरोज भाई !.







