जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील धनाजी काळे नगरात दारू पिण्यासाठी महिलेने पैसे दिले नाही म्हणून एकाने शिवीगाळ करून जवळ असलेली विट डोक्यात मारून दुखापत केल्याची घटना रविवारी ७ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली दिनेश आकुले ही महिला आपल्या परिवारासह राहायला आहे. रविवार ७ मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास महिला घरी असतांना त्याच भागात राहणारा गणेश सानप हा घरी आला. त्याने महिलेकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतू महिलेने पैसे दिले नाही म्हणून गणेश सानप याने महिलेला शिवीगाळ करून हातातील विट महिलेच्या डोक्यावर फेकून मारली. याप्रकरणी महिलेने सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश सानप याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय झाल्टे करीत आहे.