जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित पाटील धर्मार्थ दवाखान्याची समिती इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आली आहे.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीकडुन शहरात व जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जातात. पाटील धर्मार्थ दवाखान्याची देखील स्थापना जळगाव शहरातील वाघ नगर रिक्षा स्टॉपजवळ ना नफा ना तोटा तत्त्वावर करण्यात आली आहे.
पाटील धर्मार्थ दवाखान्याचे चेअरमन डॉ. अनिल शिरसाळे यांनी दवाखान्याची संपुर्ण माहिती व कामकाज कशाप्रकारे चालवले जाणार याविषयी मार्गदर्शन केले. नंतर गनी मेमन यांनी मार्गदर्शन केले.
निवड करण्यात आलेल्या समितीमध्ये सदस्य संजय पाटील, प्रा. दिलीप भारंबे, रविंद्रसिंग पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, प्रशांत पाटील, सुमित देशमुख, दिपक सपकाळे, अजय पाटील यांचा समावेश आहे. रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, रेडक्रॉस रक्तकेंद्राचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रेडक्रॉस सोसायटी आपत्ती व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुभाष साखला उपस्थित होते.