जळगाव ( प्रतिनिधी ) – रिक्षात बसवुन प्रवाशांचे पैसे हातचलाखीने लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली आहे .
गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात रिक्षात प्रवाशांना बसवून हातचलाखीने त्यांचे पैसे चोरून थोडे अंतरावर त्यांना उतरवून पसार होणारी अज्ञात चोरट्यांची टोळी सक्रिय होती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी तपासासाठी पोह जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बावीस्कर, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, नंदलाल पाटील, ईश्वर पाटील, राजेंद्र पवार यांचे स्वतंत्र पथक नेमले होते.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना खबऱ्याकडून गुप्त बातमी मिळाली की , याबल पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फिर्यादीसोबत रिक्षात बसून
पैसे काढले आहेत. हा गुन्हा रेकॉर्डबरील गुन्हेगार मोसीन उर्फ शेमडया पठाण ( बय २८, रा.पिंप्राळा हुडको जळगाव ) व त्याचे इतर साथीदार यांनी केल्याची माहिती मिळाली त्याचा शोध घेत असतांना त्याच्यासह अरशद शेख हमीद शेख ( बय २४, रा.सुरेशदादा नगर, गेंदालाल मिल जळगाव ) , शेख फिरोज शेख करीम ( वय ३०, रा.गेंदालाल मिल बिल्डींग नं.२८, रुम नं.२५ जळगाव ) , मनोज विजय अहिरे ( बय ३१, रा.गेंदालाल मिल बिल्डींग नं.२१ रुम नं.४० जळगाव ) त्यांनी गुन्ह्यांत वापरलेल्या रिक्षासह डि मार्टजवळ मिळून आले त्यांना ताब्यात घेवून विचारपुस केली या आरोपीनी यावल व पारोळा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचीही कबुली दिली दोन्ही गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व चोरलेले पैसे हस्तगत करण्यात आले आहेत.