अमळनेर ( प्रतिनिधी ) – मारवड येथील रहिवाशी व मारवडचे माध्यमिक शिक्षक नितिन सनेर ( मुळगांव हातेड, ता.चोपडा ) यांचे पूत्र डॉ. चेतन सनेर यांनी महाराष्ट्र आरोग्य विझान विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एम.डी.( जनरल मेडीसीन ) परीक्षा सेठ जी.एस.मेडीकल कॉलेज, के.ई.एम.हॉस्पिटल मुंबई येथून उत्तम गुण संपादन करुन उत्तीर्ण केली.
डॉ.चेतन सनेर यांनी एम.बी.बी.एस.चे तसेच एम.डी.( जनरल मेडीसीन )चे शिक्षणही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील सेठ जी.एस.मेडीकल कॉलेज,के.ई.एम.हॉस्पिटल परळ,मुंबई येथून पूर्ण केले.ते मुंबई येथील के.ई.एम.रुग्णालयात कार्यरत आहेत.
डॉ.चेतन सनेर यांनी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करुन चिकाटीच्या जोरावर उच्च श्रेणीत एम.डी.( जनरल मेडीसीन )ची परीक्षा पास झालेत. डॉ.चेतन सनेर यांचा पुढे डी.एम.( सुपर स्पेशालीटी )दिल्ली, चंदिगड किंवा मुंबई येथून करण्याचा मनोदय आहे.