पहूर ( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील लोंढरी गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी शनिवारी ७ जानेवारी रोजी पहुर पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पहूर पोलिसांनी दिलेली माहितीवरून, जामनेर तालुक्यातील लोंढरी गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह राहायला आहे. ७ जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात झोपलेली असताना गावात राहणारा गजानन तुकाराम तनपुरे यांनी अल्पवयीन मुलीला काहीतरी फूस लावून पळून नेल्याचे समोर आले यावेळी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा गावात सर्वत्र शोध घेतला परंतु ती कुठेही मिळून आल्याने अखेर दुपारी तीन वाजता पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी गजानन तुकाराम तनपुरे यांच्या विरोधात व पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहे.