मुंबई (वृत्तसंस्था) – आपल्या कवितांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची एक घोषणा करोना काळात चांगलीच गाजली होती. राज्यातील अनेक नेत्यांना करोनाने घेरले होते. अखेरच्या टप्प्यात करोनाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना गाठले आहे. यावरून आठवले यांनी एक कविता करत देशमुख यांना काळजीचा सल्ला दिला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत अनिल देशमुख यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर रामदास आठवले यांनी ट्विट करत त्यांना हा काळजीचा सल्ला दिला आहे.
‘अनिल देशमुखजी आप कोरोना से मत डरोना, मैने तो बोला है, गो कोरोना, कोरोना से मत हरोना’, असे ट्विट रामदास आठवले यांनी केले आहे. या ट्विटला अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मीम्सद्वारे त्यांच्या या पोस्टला प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे ट्विटद्वारे सांगितले होते.







