जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयात संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त माल्यार्पण करून स्मरण करण्यात आले. ह्यावेळी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण झाले.

यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी जी.जी. दिघावकर, प्रशासकीय अधिकारी आर. यु. शिरसाठ, स्त्री रोगतज्ञ डॉ.एस.पी. चव्हाण, कर्मचारी रवींद्र मुळे, दिलीप मोराणकर, नरेंद्र वाघ आदी कर्मचारी उपस्थित होते.







