जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग ३ मधील मुख्य डांबरी रस्ते दुरुस्तीच्या कामाला मंगळवारी सुरुवात करण्यात आली. महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ झाला.

अमृत योजना आणि भूमिगत गटारींमुळे अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. मंगळवारी प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत मुख्य डांबरी रस्ते दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, महिला बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, प्रवीण कोल्हे, दत्तात्रय कोळी, भारत सपकाळे, मनपा बांधकाम अभियंता रंधे यांची प्रमुख उपस्थिती होती.







