पाचोरा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या अध्यक्षपदी चोपडा येथील ऋषी पाटील तर पाचोरा येथील प्रल्हाद वाघ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी जिल्ह्यातील कृषी पदवीधर मित्र, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांवर वारंवार उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे नियुक्ती जाहीर झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्र्वासन दिले आहे. तसेच अध्यक्ष ऋषी पाटील व प्रल्हाद वाघ यांचे नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.







