रावेर ( प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील निमड्या येथे एका तरुण व्यक्तीचा खुन झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे.या घटनेमुळे रावेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
रावेर तालुक्यातील निमड्या या गावात एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याचे घटना आज सकाळी उघडकीला आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस निरिक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे आणि रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. संजय बारेला (32, निमड्या, ता.रावेर) असे खून झालेल्याचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. बारेला यांचा खून कुणी व का केली? याची माहिती अद्याप निष्पन्न झालेली नाही.
नेमका हा खून कोणी केला व कोणत्या कारणासाठी केला, याबाबत चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात रावेर पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरू होते.