जळगाव;- शहरातील अजिंठा चौक परिसरातील सर्वच भंगार बाजारात एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दुपारी अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत चोरीच्या दोन दुचाकींसह दोन चारचाकींचे इंजिन मिळून आले असून पोलिसांनी जप्त केले आहे. ऑपरेशनमध्ये शहरातील पाचही पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी सहभागी झाल्याने भंगार बाजाराला छावणीचे स्वरुप आले होते.
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी गुरुवारी दुपारी अचानक पोलिसांचा ताफा घेऊन अजिंठा चौक परिसरातील सर्वच भंगार बाजारात कोम्बीग ऑपरेशन राबविले. ऑपरेशनमध्ये शहर, तालुका, शनिपेठ या पोलीस ठाण्यांमधील कर्मचार्यांचा सहभाग होता