जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे खुल्या डि.पी. ला चिकटून जाफराबादी या जातीची दुध देणारी म्हैस मृत झाली. या घटनेला सुमारे १० दिवस उलटुन गेल्यावर ही महावितरणकडुन कोणतीही आर्थिक मदत चंद्रकांत रविंद्र धनगर या गरीब मालकास मिळालेला नाही तरीही या संदर्भात लवकरात लवकर पाठपुरावा करुन तात्काळ मदत देण्यात यावीसाठी तालुका काँग्रेसतर्फे निवेदन व जाब विचारण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष – मनोज चौधरी , प्रमोद घुगे , भाऊसाहेब सोनवणे ,धनराज जाधव, भिकन सोनवणे व म्हैस मालक चंद्रकांत धनगर उपस्थित होते.