• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव जिल्हा दूध संघाच्या अपहारप्रकरणाचा अखेर गुन्हा दाखल

तिन्ही तक्रारीची चौकशीअंती मध्यरात्री दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी) – जिल्हा दूध संघातील अपहार तसेच चोरीच्या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी स्वतः फिर्यादी जावून एकनाथ खडसे गट तसेच भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या तक्रारींची चौकशी करून या प्रकरणात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा दूध संघाबाबत अपहार व चोरी झाल्याबाबत एकुण तीन तक्रारी आलेल्या आहे. या अनुषंगाने तीनही तक्रारींची प्राथमिक चौकशी घेण्यात आलेले जबाबानुसार दुध संघात एकुण १ कोटी १५ लाख रूपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकार पक्षातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ११ ऑक्टोबर २०२२ रोजी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिस अधिक्षक यांना अर्ज दिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, जळगाव जिल्हा दुध संघातून सुमारे १४ टन बटर (लोणी) व ८ ते ९ टन म्हशीच्या दुधाची भुकटी (मिल्क पावडर ) सुमारे २ ते २.५ कोटी रुपये मुद्देमालाची परस्पर विल्हेवाट लावुन टाकण्यात आलेली आहे. सदरची विल्हेवाट ही दुध संघाचे चेअरमन, कार्यकारी संचालक काही मोजके कर्मचारी यांनी अंत्यत हुशारीने व नियोजन पद्धतीने लावलेली आहे. सदरचा अर्ज हा सीआरपीसी १५४ अन्वये फीर्याद नोंदवावी याबाबत अर्जात नमुद केलेले होते.

तसेच मनोज गोपाळ लिमये (वय-५९ वर्ष, रा. दुध संघ कॅंपस जळगाव) यांचा १२ ऑक्टोबर २०२२ रोजी जबाब नोंदविला असता, त्यात म्हटले आहे की, जळगाव सहकारी दुधसंघ येथे कार्याकरी संचालक म्हणुन ते सन मार्च २०२२ पासून कार्यरत असुन त्यांच्यावर नियंत्रण हे संचालक मंडळाचे असल्याने दुध संघाची संपुर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. सदर दुधसंघात शेतकरी यांचेकडून दुध संकलीत करुन दुधापासुन अनेक दुग्धजन्य पदार्थ बनविले जातात. व ते ब्रेडींग करुन ते मार्केटमध्ये वितरीत केले जाते.

८ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ९.३० वाजता मनोज लिमये यांनी संदिप झाडे, स्वप्निल जाधव, नितिन पाटील, महेद्र केदार यांनी विक्री विभागातील प्रत्यक्ष पांढऱ्या लोण्याचा साठा तपासणीचे निर्देश दिले असता त्यांच्या तपासणीत २ ऑक्टोबर २०२२ रोजी १४ टन पांढरे लोणी अंदाजे किंमत ७० से ८० लाख रुपये संघाच्या बाहेर सातारा जिल्ह्यातील वाई येथे शितगृहात पाठविल्याची नोंद साठा रजिस्टरमध्ये घेण्यात आलेली आहे. परंतु असे प्रत्यक्षात कोणतेही वाहन साठा घेवुन दुधसंघाचे बाहेर गेलेले नाही. याची इन व आउट गेटमध्ये नोंद नाही, तरी तपासणीत २ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेली नोंद ही खोटी असल्याचे तपसणी पथकाच्या निदर्शनास आलेले आहे. तसेच तपासणी पथकास अभिलेखानुसार ९ मॅट्रीक टन दुध पावडरमध्ये अंदाजे ३० ते ३५ लाखांचा अपहार झाल्याचे दिसून आले. असे एकंदरीत १ कोटी १५ लाख रुपयेचा अपहार झालेला आहे. असे मनोज लिमये याची तक्रारीत नमुद आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपासात समोर आले की, कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी या प्रकरणात ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले, त्यांच्या निलंबन आदेशात अपहार नमूद केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये यांनी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेल्या जबाबत अपहार असे दिलेले होते. परंतु ते त्यांना १३ ऑक्टोबर रोजी पुन्हा पोलिस निरीक्षक जळगाव शहर पोलिस स्टेशन यांच्या नावाने लेखी फीर्याद देऊन त्यात त्यांनी अपहार नसुन चोरी झाली बाबत नमुद केले होते. तिन्हीही तक्रारींची प्राथमिक चौकशीमध्ये घेण्यात आलेले जबाब तसेच कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी काढलेल्या निलंबन आदेशात प्रथम दर्शनी अनंत अशोक अंबीकर, महेंद्रा नारायण केदार यांनी त्यांच्या नियंत्रणातील विभागात असलेल्या यंत्रणेत फार मोठा गैरव्यावहार व अफरातफर केल्याचे व खोट्या नोंदी केल्याचे आढळून आलेले असून गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केले असे निदर्शनास आल्याने दोघांना ११ ऑक्टोबर रोजी कार्यालयीन वेळेनंतर निलंबित करण्यात आले आहे.

जिल्हा दूध संघातील या प्रकरणात दोघांनीही तक्रार दिली असल्याने नेमकं कोणाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. हा सस्पेन्स काय असून पोलिसांच्या तपासात नेमकं काय ते समोर येणार आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे ह्या जिल्हा दूध संघाचा चेअरमन म्हणजेच प्रमुख असल्याने हा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

सरपंचांनी आपल्या अधिकाराचा योग्य वापर करत गावाचा विकास साधावा – आ. किशोर पाटील

Next Post

वृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वृद्ध महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon