जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील अयोध्या नगर परिसरातील श्री प्लाझा अपार्टमेंट येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय वृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील अयोध्या नगर परिसरातील हॉटेल कमल प्राईड जवळ असलेल्या श्री प्लाझा अपार्टमेंट येथील फ्लॅट नंबर १०३ मध्ये विजयालक्ष्मी भरत सोनवणे (वय-६२) ह्या आपल्या पतीसह राहायला आहे. त्यांनी सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास राहत्या घरात त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान विजयालक्ष्मी भरत सोनवणे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.