न्युयॉर्क (वृत्तसंस्था) – अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही चांगलीच रंगली आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात विजयासाठी लढत चुरशीची होताना दिसत आहे. आता बायडन विजयाच्या समीप पोहोचले आहेत, मात्र ट्रम्प मतगणनेच्या विरोधात न्यायालयात गेल्याने अंतिम निकाल येण्यासाठी वेळ लागत आहे. दरम्यान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने दाखल केलेल्या मिशिगन आणि जॉर्जियामधील केसेस न्यायालयाने फेटाळल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्रम्प यांना चिमटा काढला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याच शब्दात ग्रेटा थनबर्गने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ग्रेटा म्हणाली कि, हे खूपच हास्यास्पद आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रोगावरील अॅंगर मॅनेजमेंटवर काम केले पाहिजे. किंवा त्यांनी आपल्या एखाद्या मित्राबरोबर छानसा जुना चित्रपट पाहावा. शांत व्हा ट्रम्प.. शांत व्हा, असे ट्विट तिने केले आहे.