जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रिंगरोड परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी ६ मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिंगरोड परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहते. शनिवारी ६ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही रिंगरोडवरील जिल्हा बँकेजवळून घरी पायी जात असतांना फूस लावून पळवून नेत अपहरण केले आहे. हे अपहरण मयूर (पुर्ण नाव माहित नाही) रा. निमखेडी ता.जि.जळगाव याने केला आहे अस आरोप पिडीत मुलीच्या भावाने केला असून तशी तक्रार दिली आहे. दरम्यान पिडीत मुलीचा सर्वत्र शोध घेतला परतू मुलगी कुठेही मिळून आली नाही. अखेर पिडीत मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी ६ मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.