रावेर (प्रतिनिधी) – चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून रावेर तालुक्यातील एका गावात दहा वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १ मे रोजी रात्री पावणे आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
दहा वर्षीय मुलीचे कुटुंबिय घरी नसल्याची संधी साधून तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत प्रदीप सुका कोळी याने बालिकेला दुकानात बोलावले. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी प्रदीप कोळीला अटक केली असून, पुढील तपास उपनिरीक्षक अन्वर तडवी करत आहेत.