जळगांव.( प्रतिनिधी ) – शहरातील अजिंठा चौफुली भागात संशयास्पद फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी चोऱ्यांची कबुली देत चोरलेल्या ३ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात दिल्या . आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे .
एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे बरेच गुन्हे दाखल आहेत . या चोऱ्यांच्या तपासासाठी पो नि प्रताप शिकारे यांनीं पथक स्थापन केले आहे . २ जुलै रोजी हे पथक अजिंठा चौफुली येथे गस्तीवर असताना भुसावळकडुन येणारे २ मोटरसायकलस्वार संशयास्पद फिरतांना दिसल्याने पथकाने त्यांना थांबवुन चौकशी केली त्यांनी त्याच्या ताब्यातील मोटारसायकलींबाबत समाधानकारक माहीती दिली नसल्याने पथकाने कसुन चौकशी केली अभिषेक उर्फ निक्की नंदलाल मिश्रा ( रा, भुसावळ ) व शुभम सुनिल पाटील ( रा शिरपुर कन्हाळा रोड घोडेपीर बाबा भुसावळ ) अशी या संशयितांची नावे आहेत
त्यांनी एक पॅशन प्रो कंपनीची विना नंबर प्लेटची जळगाव बाजार समिती गेट जवळुन चोरी केले असल्याचे सांगीतले त्यांनतर एक हीरो सुपर स्प्लेंडर कंपनीची व तिसरी फॅशन प्रो अशा 3 मोटारसायकली काढुन दि ल्या आहे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे या चोरीचा गुन्हा दाखल आहे
या संशियितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई सफौ. आनंदर्सिंग पाटील, पोहेका मिलींद सोनवणे, पोना. गणेश शिरसाळे, योगेश बारी, विकास सातदीवे, किशोर पाटील यांनी केली.