चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शेतातून बैलगाडी नेण्याच्या वादात तरूणासह त्याच्या कुटुंबियांना सहा जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“चाळीसगाव शहरातील खडकी बायपास येथे ज्ञानेश्वर मुरलीधर मांडोळ (वय -२३) कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तो चालक असून शेतीदेखील करतो. ३ जुलै रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर घरी असतांना त्याच भागातील रहिवाशी सचिन जनार्दन थोरकर, गणेश सुरेश शिंदे, मनोज सोपान गादीकर, विशाल माधवराव मांडोळे, जयश्री चुनीलाल थोरकर, माधवराव दौलत मांडोळे ( सर्व रा. खडकी बायपास ) यांनी शेतातून बैलगाडी का घेवून गेला या कारणावरून ज्ञानेश्वर मांडोळे याला बेदम मारहाण केली. ज्ञानेश्वरचे काका भिमराव मांडोळे, काकू मिनाबाई मांडोळे, वडील मुरलीधर मांडोळे, आई छायाबाई मांडोळे, काका सतिश मांडोळे, काकू अरूणाबाई मांडोळे, भाऊ सचिन यांनाही लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली.
ज्ञानेश्वर मांडोळे याने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून संशयित सचिन थोरकर, गणेश शिंदे, मनोज गादीकर, विशाल मांडोळे, जयश्री थोरकर, माधवराव मांडोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ किशोर सोनवणे करीत आहेत.