भुसावळ (प्रतिनिधी) – येथील नगराध्यक्ष रमण भोळे हे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे भुसावळ नगरपालिकेचे काम
आपत्कालीन सेवा वगळता दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.


रविवार दि. ६ रोजी सायंकाळीच नगराध्यक्ष रमण भोळे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी याबाबत
स्वत:हून माहिती जाहीर करत आपल्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तपासणी करून काळजी
घ्यावी, असे आवाहन केले होते. भुसावळ नगरपालिकेचे काम आपत्कालीन सेवा वगळता दि. ७ पासून दोन
दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. आज आणि उद्या भुसावळ नगरपालिकेचे काम बंद राहणार असल्याची
माहिती मुख्याधिकारी यांनी सांगितले.







