जळगाव (विशेष प्रतिनिधी) – आपले सरकार सेवा केंद्र असोदा येथे महाआयटी अंतर्गत आधार नोंदणी केंद्र ग्राम पंचायत कार्यालय असोदा शेजारी येथे सुरू झाल्याने ग्रामस्थाना आधार नोंदणी व दुरुस्तीसाठी सुविधा ही गावातच मिळत असल्याने ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले.
आधार तसेच विविध शैक्षणिक कागदपत्रे या कामासाठी ग्रामस्थाना ठीक ठिकाणी हेलपाट्या मारावे लागत होते मात्र आता आसोद्यात आधार केंद्र सुरू झाल्याने तालुक्याच्या ठिकाणी होणारे हेलपाटे आता मारावे लागणार नाही. तसेच उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमलियर दाखले व विद्यार्थाना लागणारे शैक्षणिक कागदपत्रे, उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमलियर दाखले सर्व प्रकारचे प्रमाणपत्र हे ऑनलाइन आणि डिजिटल पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्रातुन मिळणार असल्याचे केंद्र चालक राजु पिताबर कोळी यांनी सांगितले.









