चाळीसगाव (प्रतिनिधी)- टाकळी प्र चा येथील माऊली कृपा नगरमध्ये नुकताच येथील रहिवाशी जि प उच्च प्राथमिक शाळा ओढरे येथे कार्यरत असलेले जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक वासुदेव महाराज माळी (पोहरेकर)यांना चाळीसगाव येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न २०२० हा पुरस्कार मिळाल्या प्रित्यर्थ त्यांचा माऊली कृपा नगर च्या वतीने शाल श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी रवींद्र पाटील व सत्कारार्थी वासुदेव माळी यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थितांमध्ये सुनील पाटील,पी.के.पाटील, राजेंद्र पाटील राजेंद्र कोळी, किशोर चव्हाण ,सुनील पाटील,राजेंद्र सोनवणे, अशोक चौधरी,संजय शेलार,संजय महाजन, हरिचंद पिंगळे, भदाणे सर , नरेंद्र शिरूडे,चौधरी बाबा डॉ रितिकेश माळी, कृष्णा देवरे आदी उपस्थित होते. अशोक चौधरी यांनी आभार मानले.