जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील आयोध्या नगरातील रायसोनी शाळेसमोरून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम रामदास ईश्वर (वय-२७ रा. अयोध्या नगर ) हे व्यापारी आहेत . त्यांच्याकडे एमएच १९ डीडी ९१८३ क्रमांकाची मोटारसायकल आहे २ एप्रिलरोजी दुपारी त्यांनी मोटारसायकल त्यांच्या घरासमोरील रायसोनी शाळेसमोर लावली होती. सायंकाळी मोटारसायकल जागेवर आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोध घेतला. कुठेही आढळून आली नसल्याने एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ६ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना विकास सातदीवे करीत आहेत.