भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ परिसरातील १७ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ५ एप्रिलरोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता ती कुठेही आढळून आले नाही. अखेर त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहेत.