जळगाव ( प्रतिनिधी ) – जोशी वाडा येथील माहेर असलेल्या विवाहितेला पैशासाठी मारहाण केल्याची घटना घडली एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोशी वाडा येथील माहेर असलेल्या रेहानाबह कुरबान खान (वय-२५) यांचा विवाह जळगावातीलच आझाद नगर, पिंप्राळा येथील कुरबान खान इस्माईल खान याच्यासोबत झाला. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती कुरबान खान याने विवाहितेला माहेरहून पैसे आणावे यासाठी तगादा लावला. परंतु माहेरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विवाहितेने माहेरून पैसे आणले नाही. त्याचा राग मनात धरून पती कुरबान खान याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर सासू, सासरे दिर आणि नणंद यांनी देखील विवाहितेकडे पैशांचा तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. ६ एप्रिल रोजी विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार केली त्यांच्या तक्रारीवरून पती कुरबान खान , सासु फरिदा खान , सासरे इस्माईल खान, दीर शेर खान , सुभान खान आणि सुलतानाबी खान ( सर्व रा. आजाद नगर, पिंप्राळा) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे कॉ संजय धनगर करीत आहेत .