पाडळसरे ( प्रतिनिधी ) – पाडळसरे येथे चैत्रोत्सवात सलग आठवडाभर धार्मिक कार्यक्रम अंबिका माता प्रतिष्ठाण व ग्रामस्थांनी आयोजित केले आहेत पुरोहित रवींद्र काळे व निमचे लक्ष्मण महाराज यांनी तीन दिवस गणेश यागाचे पूजन केल्यावर देवी भागवत पारायणाने चैत्रोत्सवाला प्रारंभ झाला . ९ एप्रिलपासून अखंड हरिनाम कीर्तन व भागवत कथा सोहळ्याचे आयोजन केले आहे हनुमान जयंतीला काल्याच्या किर्तनाने सांगता होईल.
हभप स्व डोंगर महाराज यांनी १९६१ पासून सुरू केलेल्या ग्रामदैवत अंबिका मातेचा चैत्रोत्सवनिमित्त ९ ते १६ एप्रिलपर्यंत श्रीराम नवमी व हनुमान जयंतीचे औचित्य साधून भागवत सप्ताह कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे
शनिवारी अंबिका मातेच्या मंदिराच्या नियोजित जागी विठ्ठल रुक्मिणी मूर्त्याची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे अंबिका मातेच्या मूर्तीचा अभिषेक करून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व चैत्रोत्सवाला सुरुवात होईल, दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती होऊन ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण व ९ ते ११ भागवत पारायण होऊन दुपारी २:३० ते ५:३० भागवत कथा निरुपण तर सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व ६ ते ६:३० सांज आरती होईल रात्री ८ ते १० या वेळी आळंदी येथील कीर्तनकारांचे कीर्तन होईल भागवत कथा निरुपण भागवताचार्य हभप नंदकिशोर महाराज लासुरकर करतील वेदमूर्ती हभप दिलीप पाठक शहादेकर देवी भागवत जप करतील भजनाची साथ संगत हभप अंबालाल महाराज करतील .
कीर्तन सप्ताहात अनुक्रमे हभप बबन महाराज ( पिंपळेसीमकर ) , हभप तुकाराम महाराज ( खोक्राळेकर ) , हभप योगेश महाराज( वाघाडीकर ), हभप योगेश महाराज ( वाघाडीकर ),हभप शामसुंदर महाराज ( घोडगावकर ), मच्छिंद्र महाराज ( वाडिभोकरकर ) , १५ एप्रिलरोजी दुपारी ग्रंथाची व मूर्त्याची पालखी मिरवणूक व दिंडी सोहळा होईल रात्री हभप माधवराव महाराज ( धानोरेकर ) यांचे जागराचे कीर्तन होईल हनुमान जयंती निमित्त गजानन महाराज यांचे पहाटे ९ ते ११ या वेळेस काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन अंबिका माता प्रतिष्ठाण, पाडळसरे ग्रामस्थांनी केले आहे.