पारोळा ( प्रतिनिधी ) – किरीट सोंमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी पारोळा आणि एरंडोल येथे रास्ता रोको आंदोलन आज करण्यात आले
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली पारोळा आणि एरंडोल येथे सोमय्या यांचा पुतळा दहन करण्यात आला पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या अटकेसाठी निवेदन देण्यात आले पारोळा येथे आर.बी. पाटील , ( ता.प्रमुख ) , अशोक मराठे ( शहर प्रमुख ) , अण्णा चौधरी ( माजी शहरप्रमुख) , बाप्पु मिस्त्री , विवेक माळी , भरत सोनवणे ,सुनील पाटील , प्रवीण हटकर , अमोल पाटील , सुयश पाटील आदी आंदोलनात सहभागी झाले होते
एरंडोलमध्ये वासु पाटील ( ता.प्रमुख ), रवी चौधरी ( उप ता.प्रमुख ) , सुधीर मानुधने , हेमंत पाटील , प्रमोद महाजन ( नगरसेवक ) , विजय देशमुख , अनिल महाजन , गणेश महाजन , संदीप पाटील ( शाखा प्रमुख भालगाव ) , करण पाटील , गजू महाजन , संदिप पाटील , निंबा पाटील , रुपेश माळी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.