वॉशिंग्टन (वृत्तसंथा) – चीनने भारताच्या सीमेवर 60 जवान तैनात केल आहेत, अशी माहिती अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी दिली आहे. त्यांनी चीनच्या या दादागिरीच्या वर्तणुकीचा निषेधही केला आहे. चीन आसपाच्या देशांना सतत धमकावण्याची कृती करतो आहे, त्यांचे हे वागणे योग्य नाही, अशी प्रतिक्रियाही पॉम्पेओ यांनी दिली आहे.
चीन क्वाड देशांना म्हणजेच अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना सतत आव्हान देण्याची भाषा करीत असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. या देशांच्या विदेश मंत्र्यांची मंगळवारी टोकिओमध्ये बैठक झाली.
शुक्रवारी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पॉम्पओ यांनी सांगितले की, भारताच्या उत्तरेकडील सीमेनजिक चीनने 60 हजारांचे सैन्य जमवले आहे. चीनने क्वाड देशांपुढे सतत असे आव्हानाचे वातावरण निर्माण केले आहे.
क्वाड देश म्हणजे जगातील शक्तिशाली लोकशाहीवादी अर्थव्यवस्था असलेल्या चार देशांची संघटना आहे. त्यात भारतासह अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश आहे.
पॉम्पेओ म्हणाले की, या चारही देशांच्या बाबतीत चीनकडून सध्या अनेक प्रकारची आगळीक सुरू आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून निर्माण झालेल्या धोक्याच्या संबंधात आम्हीं एकत्र आलो आहोत असेही त्यांनी नमूद केले.
भारताचे विदेश मंत्री जयशंकर यांच्याशी आपली या विषयावर चर्चा झाली ती अत्यंत फलद्रुप झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.