जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील पंचवीस वर्षीय गृहिणी लहान मुलींसह घरात एकटी असताना एकाने तिच्यावर घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडिताने प्रतिकार करून आरडा ओरड केल्याने शेजार्यांच्या मदतीने तिची सुटका झाली. जिल्हापेठ पेालिस ठाण्यात या प्रकरणी संशयीताविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात पंचवीस वर्षीय विवाहिता दोन मुलींसह वास्तव्यास आहे. पती रुग्णालयात असल्याने ती मण्यांची पोत बनवण्याचे काम करून उदरनिर्वाह चालवते. शनिवारी रात्री दहा वाजता पिडीतेचा जेठ नीलेश किशनलाल परिहार घरात शिरला व त्याने तोंड दाबून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रतिकार करून आरडाओरड केल्याने शेजार्यांनी मदतीला धाव घेतली. घडला प्रकार पिडीतेने बहीणीला सांगीतल्या नंतर मेहुणे, सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांच्या मदतीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. पिडीतेने दिलेल्या जबाबावरून निलेश किशनलाल परिहार रा कालिंका माता परिसर याच्या विरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.