पाचोरा (प्रतिनिधी) – श्रीमंतांसाठी सर्व हजर असतात पण गरीबांसाठी वेळेवर कोणी उपस्थित राहत नाही असे अनुभव सर्वांना अनेकदा मिळत असतात.सध्या कोरोना काळ सुरू असुन या काळात सहजासहजी मदतीसाठी कोणी पुढे येत नसतात अशातचं बांबरूड येथील कोवीड सेंटर’ला दररोज थंड पाण्याने रूग्णांना अंघोळ करावी लागत असते.रूग्ण हे आजारी असल्याने वरून त्यांना पाणी थंड ? हि परीस्थिती असतांना याबाबत काही रूग्णांनी पाचोरा राजकारण ग्रुप अॅडमिन अजयकुमार जैस्वाल यांना या समस्येबाबत फोनवरून तक्रार दिली असता त्याच क्षणी शासकीय यंत्रणेची वाट न पाहता थेट लोक सहभागाची व मदतीचे आवाहन केले असता जेष्ठ पत्रकार महिंद्रभाऊ अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन जिवनभाऊ जैन & दिनेशभाऊ बोथरा यांच्याशी संपर्क साधुन माहिती दिली असता एक दोन गिझर’ची मागणी असता जिवनभाऊंनी व दिनेश भाऊंनी तब्बल चार गिझर अर्ध्या तासात देण्याचा निर्णय घेतला.
आज सकाळी शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांच्या हस्ते रूग्णांसाठी लोकार्पण करण्यात आले.गिझरमुळे रूग्णांना गरम पाणी तर अंघोळीसाठी आता मिळणार तर आहेचं यापुढे हिवाळ्यात सुध्दा फार महत्वाचे कामात पडणार आहे.चार गिझर’ची अंदाजित रक्कम – २० ते २२ हजार रूपये पर्यंत आहे.
आज या गिझर लोकार्पणासाठी तहसिलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ,जेष्ठ पत्रकार महिंद्रभाऊ अग्रवाल, सुमित सावंत, शरद पाटील व पत्रकार सोनु परदेशी उपस्थित होते.
गिझर मिळाल्याने कोवीड सेंटरमधील रुग्णांनी पाचोरा राजकारण ग्रुप चे आभार तर पाचोरा राजकारण ग्रुप ने जिवनभाऊ जैन & दिनेशभाऊ बोथरा आणि महेंद्रभाऊ अग्रवाल यांचे जनता मागणीची दखल घेतल्याबद्दल मनपुर्वक आभार मानले आहेत.