जामनेरच्या पाळधी येथील शेतकऱ्यांचा निवेदनाद्वारे इशारा
जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पाळधी येथील काही शेतकऱयांची शेतजमीन सरकारने भूसंपादित केली होती. मात्र, त्याचा कुठलाही मोबदला दिला नाही त्यामुळे त्यामुळे मोबदला मिळावा अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
लघुपाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, आमची शेतजमीन भूसंपादन प्रस्ताव ७२/०५ अन्वये संपादित झालेली आहे. यात दिवाणी न्यायालयाचा निकाल झालेला असून या निकालाविरुद्ध आपल्या कार्यालयातर्फे उच्च न्यायालयात अपिलाबाबत कार्यवाही झालेली आहे. मात्र, यात कोणतेही आदेश शेतकऱ्यांविरुद्ध झालेले नाहीत. आपण आमचा मंजूर मोबदला आम्हास दिलेला नाही. ५ ते ६ वर्षांचा कालावधी लोटला असूनही यावर कुठलीही कार्यवाही आपण केलेली नाही. असे सांगत, निवेदनात मोबदला देण्याविषयी सांगण्यात आले आहे. मोबदला न दिल्यास, २४ नोव्हेंबर पासून सर्व शेतकरी उपोषणाला बसतील असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर समाधान संतोष पाटील, दिलीप संतोष पाटील, सोपं शामराव सोनवणे, संजय भावलाल बडगुजर, देवळाबाई भागवत पाटील, विठ्ठल कडू पाटील, शालिक उखा बाविस्कर, रामदास नारायण पाटील, नाना भागवत पाटील, मुलचंद झुंबरलाल चोरडिया, शालिक बाविस्कर यांच्या स्वाक्षऱ्या आहे.