रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील ऐनपूर येथील रामदेव बाबा नगरात ( वाल्मीक नगर ) उधारीच्या १३० रुपयांवरून वाद झाल्याने गुप्तांग पिळून तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
भीमसिंग जगदीश पवार ( वय २८ ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. पन्नालाल कोरकू याची टपरी असून त्याचे उधारीचे १३० रुपये भीमसिंग पवार याच्याकडे बाकी होते. गुरुवारी भीमसिंग फिरत असताना ते उधारीचे पैसे देण्या घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला . त्यात पन्नालाल कोरकू ( वय ५५) याने भीमसिंग पवार याचे गुप्तांग पिरगळून टाकले. भीमसिंगला तत्काळ रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी पन्नालाल कोरकू फरार झाला आहे.
फैजपूर विभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व पोलिसांना तपासाच्या सूचनाही दिल्या. या गुन्ह्याचा तपास निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ , पो हे कॉ ज्ञानेश्वर चौधरी , स्वप्नील पाटील , अब्बास तडवी करीत आहेत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.