जळगाव ( प्रतिनिधी ) – पिंप्राळा हुडको भागातील गौतम नगरात घरातून तरुणाचा ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेला रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला
रामदास सदाशिव अहिरे (वय-२५) हा गौतम नगर, पिंप्राळा हुडको येथे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. हा तरुण अपंग असून घरीच असतो ३ जुलैरोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्याचा ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल घरातील खिडकीतून चोरून नेला. हा प्रकार ४ जुलै रोजी उघडकीला आला. शोधूनही मोबाईल न मिळाल्याने अखेर ५ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना विजय खैरे करीत आहेत.