जामनेर ( प्रतिनिधी ) – राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती शाहू महाराज, संत सेवालाल महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी विभूतींनी समाजासाठी सर्वस्व अर्पण केलं . याच समाजसेवेच्या भावनेतून दरवर्षीप्रमाणेच 11 एप्रिलरोजी जामनेरात “श्रीलिला हॉस्पिटल” येथे “महारक्तदान शिबिराचे” आयोजन केले आहे
प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने रक्तदान करून समाजसेवेसाठी योगदान देणे गरजेचे आहे . या महारक्तदान शिबिराचे मार्गदर्शक डॉ उमाकांत पाटील , डॉ प्रशांत पाटील आहेत . रक्तदात्यांनी श्रीलिला हॉस्पिटल , गिरजा कॉलनी, भुसावळ रोड, जामनेर यांच्याशी 9970799488 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.