• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

टीईटी परीक्षेत 16, 592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 6, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – वादात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर झाला आहे. टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत चुकांमुळे वादात सापडलेल्या या परीक्षेचा निकाल अखेर लागला. या परीक्षेत 16, 592 उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले. गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. मात्र परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी लागल्याचे दिसून येत आहे. परीक्षेचा निकाल www.mahatet.in या वेबसाईटवर घोषित करण्यात आला आहे.

19 जानेवारी रोजी राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा घेण्यात आली. पेपर 1 म्हणजे पहिली ते पाचवी गटासाठीचा पेपर एक लाख 88 हजार 688 उमेदवारांनी दिला. त्यापैकी 10 हजार 487 उमेदवार पात्र झाले. तर, पेपर दोन म्हणजे सहावी ते आठवी हा पेपर एक लाख 54 हजार 596 उमेदवारांनी दिला. त्यातून सहा हजार 105 उमेदवार पात्र झाले. दोन्ही पेपर मिळून 16 हजार 592 उमेदवार पात्र झाले आहेत.

टीईटी परीक्षेच्या निकालात आरक्षण प्रवर्ग, वैकल्पिक विषय, अपंगत्व आदींचा लाभ मिळाले नसल्यास तक्रारीची सुविधा देण्यात आली आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत लॉग इन आयडीचा वापर करून तक्रार नोंदवावी, असं परिषदेकडून सांगण्यात आलं आहे. या परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राची प्रत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात येईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

राज्यात आज जवळपास 3 लाख 43 हजार 364 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत गंभीर चुका असल्याची बाब समोर आली होती. पेपरमध्ये योग्य जोड्या जुळवा, असा प्रश्न देण्यात आला होता. मात्र रकाण्यांमध्ये वेगळेच पर्याय देण्यात आले होते. तसेच वाक्‍यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती, असा प्रश्न विचारण्यात आला, मात्र वाक्‍याखाली अंडरलाईन करण्यात आलेलीच नव्हती. दोन्ही पेपरमध्ये शुद्धलेखनाच्या गंभीर चुका देखील होत्या. त्यामुळे विद्यार्थी वर्गात नाराजी पसरली होती. विद्यार्थ्यांकडून आता या चुकीच्या प्रश्नांचे गुण आम्हाला मिळावेत, अशी मागणी केली होती.


 

 

Previous Post

या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर जैसे थेच ठेवले

Next Post

अहमदाबादच्या कोविड हॉस्पिटलला भीषण आग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अहमदाबादच्या कोविड हॉस्पिटलला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

February 15, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

February 15, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon