अमळनेर (प्रतिनिधी) – सिंघमस्टाईल गुन्ह्याचा तपास करणारे पोलीसनिरीक्षक जयपाल हिरे अमळनेरला रुजू झाल्यापासून बऱ्याच सराईत गुन्हेगारांना धडकी भरली होती. पदभार स्वीकारताच रेती माफियांवर कार्यवाहीकेली.अवैध धंदे बंद केले. अल्पावधीतच आपल्या कामाची चुणूक अमळनेरकरांना दाखविली. पण गुन्हे घडणार नाही ते अमळनेर कसले. हळूहळू शहरात धुमस्टाईल चोरी करणे,घरफोडीचे प्रमाण वाढले. पेन्शनर्सचे व वृद्ध व्यक्तींचे पैसे लंपास करणे असे गुन्हे घडू लागले.
अशातच १६ जुलै ला अमळनेर अर्बन बँकेत पैलाड भागातील अशोक पाटील सोने तारण कर्ज काढण्यासाठी आले. त्यांनी ५५ हजार रुपये कर्ज घेतले व बाहेर आले.लघुशंकेसाठी सार्वजनिक स्वच्छता गृहात गेले असता त्यांच्या खिशातून अनोळखी इसमाने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून ५५ हजार रूपये जबरदस्तिने काढून घेतले.
सदर गुन्ह्याची अमळनेर पोलीस स्टेशनला ३०८/२०२१ कलम ३९२ प्रमाणे गुन्हा नोंदविला गेला. तेव्हापासून पो.हे.कॉ. दीपक हटकर गुन्ह्याचा तपास करीत आहेत. त्यांनी त्यावेळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरी करणाऱ्या इसमाचा सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल केला. व इसमाचा शोध सुरू केला.३० जुलै ला पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती वरून सदर गुन्ह्यातील आरोपी इमरान पठाण हा शिंदखेडा येथील असल्याचे समजले. तेव्हा एक पथक नेमले गेले. त्यात सुनील हटकर, रवींद्र पाटील, दिपक माळी, शरद पाटील, रवींद्र पाटील यांच्या पथकाने शिंदखेडा येथे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची तपासणी केली. तेव्हा तो समशेर पठाण (वय ३० वर्षे) असल्याचे रा. तेरा मोहल्ला शिंदखेडा येथील असल्याचे सांगितले. गुन्ह्याची कबुली देऊन पैसे मीच जबरदस्तीने चोरून नेले. अशी कबुली दिली. सदर आरोपीस गुन्ह्याकामी अटक करण्यात आली असून .आरोपीस ३१ जुलै ला मा. न्यायालयासमोर हजर केले. व ३ ऑगस्ट पर्यंतआरोपीस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. अमळनेर पोलीस पथकाने केलेल्या यशस्वी कार्यवाहीचे कौतुक होत आहे.








