जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात 911 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. आजच्या अहवालात
आज पुन्हा जळगाव शहरात 240 रूग्ण आढळून आलेत. तर अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, एरंडोल तालुक्यात कोरोनाच्या
रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आजच 518 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आज सायंकाळी जाहीर केलेल्या शासकीय माहितीनुसार जिल्ह्यात 991 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले
आहेत, आज सर्वाधीक 240 रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. तर अमळनेर-102, चोपडा-82, चाळीसगाव-65 तर
एरंडोल तालुक्यात 69 प्रमाणे आढळून आले आहेत.
जळगाव शहर-240; जळगाव ग्रामीण-41; भुसावळ-54; अमळनेर-102; चोपडा-82;
पाचोरा-44; भडगाव-10; धरणगाव-8; यावल-13; एरंडोल-69, जामनेर-63; रावेर-54; पारोळा-43; चाळीसगाव-65;
मुक्ताईनगर-4, बोदवड-10 व दुसऱ्या जिल्ह्यांमधील 9 असे एकुण 911 आढळून आले आहेत.
आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या 31 हजार 660 इतकी झालेली आहे, यातील 22 हजार
363 रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच 518 रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज 8 मृत्यू झाले असून मृतांचा
आकडा 857 इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या 8 हजार 440 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.







