जळगाव(प्रतिनिधी) – मुंबईने कंगनाला नाव दिले, प्रसिध्दीचे वलय दिले आता तीच कंगना कृतघ्नपणाची परिसीमा गाठून त्याच मुंबईला पाकव्याप्त काश्मिरची उपमा देत आहे. या व्यक्तव्याचा जळगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे अभिनेत्री कंगना रावत व भाजपाचे आ.राम कदम यांचा जळगाव येथील कोर्ट चौकात दि.5 रोजी जाहीर निषेध करण्यात आला.

मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष मुकूंदा रोटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी संदीप महाले, चेतन पाटील, पंकज चौधरी, राजेेंद्र निकम, राहुल माळी, गोविंद जाधव यांचाही सहभाग होता.







